दुसऱ्या टप्प्यातील विमा वाटप पीक विमा कंपनीने दुसऱ्या टप्प्यात एकूण 48 लाख 12 हजार

शेतकऱ्यांना 100958 लाख रुपये वितरित करण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे, ही

रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जात आहे. आतापर्यंत विमा

कंपनीने एकूण 1900 कोटी रुपये वितरित करण्याचे मान्य केले आहे.

जिल्हानिहाय लाभार्थी आणि निधीचे वाटप नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक तीन लाख 50 हजार लाभार्थी शेतकऱ्यांना 155.74 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यात 16,921 शेतकऱ्यांना 4.88 कोटी रुपये मिळतील. अहमदनगर जिल्ह्यातील 2,31,831 शेतकऱ्यांना 160.28 कोटी रुपयांचा लाभ होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात 1,82,534 लाभार्थींना 111.41 कोटी रुपये मिळणार आहेत. सातारा जिल्ह्यातील 40,406 शेतकऱ्यांना 6.74 कोटी रुपये आणि सांगली जिल्ह्यातील 98,372 शेतकऱ्यांना 22.04 कोटी रुपयांचे वाटप होणार आहे.