लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
दुसरीकडे, योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यावर येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये ज्या लाभार्थी महिलांना हप्ता मिळाला, त्या सर्व चार लाख १२ हजार ७९१ लाभार्थी बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे.
ऑक्टोबरमधील लाभार्थी बहिणींना योजनेचा दोन महिन्यांचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात जमा झाला होता. त्यामुळे आता डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जात आहे. मात्र, अद्यापपर्यंत जिल्ह्यात काही लाडक्या बहिणींनाच या हप्त्याची रक्कम मिळाली आहे. टप्प्याटप्प्याने योजनेची रक्कम जमा होणार असल्याचे महिला व बालकल्याण विभागाकडून सांगण्यात आले.
लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
नारीशक्ती दत ऑप
जिल्ह्यात नारीशक्ती दूत अॅपद्वारे एक लाख ८९ हजार ८९२, तर वेब पोर्टलद्वारे दोन लाख ३७ हजार ७४ असे एकूण चार लाख २६ हजार ९६६ महिलांचे योजनेच्या लाभासाठी अर्ज आले होते. नारीशक्ती दूत ॲपमधील एक लाख ८८ हजार २०९ अर्ज, तर वेब पोर्टलवरील दोन लाख २४ हजार ५८२ अर्ज असे एकूण चार लाख १२ हजार ७९१ अर्ज मंजूर करण्यात आले. तसेच १४ हजार ३७५ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
लाडक्या बहिणींची
.
•
तालुकानिहाय मंजूर अर्ज संख्या
तालुका लाभार्थी महिला
धाराशिव १ लाख ४१७
. परंडा ३७ हजार १०५
• वाशी २३ हजार ९२२
.
भूम ३४ हजार १११
• कळंब ५३ हजार ३७७
.
तुळजापूर ७१ हजार ११
• उमरगा ६३ हजार ९११
.
लोहारा २८ हजार ९३७
एकूण ४ लाख १२ हजार ७९१