लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये मिळणार, या तारखेला बँक खात्यात जमा January 6, 2025 by Atul लाडकी बहिणी बहिणीची नवीन लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा Eknath Shinde : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या महायुती आणि महाविकास आघाडीसह सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात सभा आणि मेळावे सुरु आहेत. या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच आज महायुतीची एकत्रित जाहीर सभा कोल्हापूरमध्ये पार पडली. या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी १० मोठी आश्वासने दिली आहेत. यामध्ये लाडक्या बहिणींना १ हजार ५०० रुपयांवरून २ हजार १०० रुपये, शेतकऱ्यांची कर्जमाफी, २५ हजार महिलांची पोलीस भरती अशी १० मोठी आश्वासने दिली आहेत. लाडकी बहिणी बहिणीची नवीन लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा “२०१४ साली झालेल्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात याच ठिकाणावरून आम्ही केली होती. आता देखील या ठिकाणाहून प्रचाराची सुरुवात आम्ही करत आहोत. आता २३ तारखेला आम्ही विजयाचा गुलाल घेतल्यानंतर पुन्हा या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाहीत. आमच्या महायुतीचा जो जाहीरनामा आहे, त्या जाहीरनाम्यातील १० प्रमुख आश्वासने आज या ठिकाणी मी तुमच्यासमोर सांगत आहे. आम्ही जे बोलतो ते करतो. त्यामुळे आता आम्ही लाडक्या बहिणींना १ हजार ५०० रुपयांवरून २ हजार १०० रुपये करणार असल्याचं आश्वासन आम्ही देत आहोत”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.