दुचाकी चालकांवर बसणार दंड १ जानेवारी पासून नवीन नियम लागू

मुंबई : नव्या वर्षाच्या स्वागताचा उत्साह आहे, न्यू ईयरसाठी तुम्ही हेल्मेट घालून डबल सीट बाहेर पडाल तर सावध राहा कारण हेल्मेट घालूनही तुमची पावती फाडली जाऊ शकतो. आता हेल्मेट घातलं तरी फावती फाडण्यामागे नेमकं काय कारण आहे, ट्रॅफिक नियम काय आहे हेच जर तुम्हाला माहिती नसेल तर आरामात तुम्हाला हजारो रुपयांचा फटका एका फटक्यात बसू शकतो. त्यापेक्षा तुम्ही हा नियम समजून घ्या.

⬇️⬇️⬇️

लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी

➡️ यादीत नाव पहा ⬅️

हेल्मेट घालूनही फाडावी लागणार पावती?
तुम्ही अनेक वेळा ऐकले असेल की तुम्ही दुचाकी चालवत असाल आणि हेल्मेट घातले नसेल तर तुम्हाला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ट्रॅफिक चालान बजावले जाईल.तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही हेल्मेट घालून दुचाकी चालवत असाल तरीही तुमची पावती फाडली जाईल. मोटार वाहन कायद्यातही एक नियम आहे ज्याची बहुधा अनेकांना माहिती नसल्यामुळे हेल्मेट घातल्यानंतरही लोकांना हेल्मेटसाठी ट्रॅफिक पोलीस पावती फाडतात. दुचाकीस्वार हेल्मेट घालतात पण हेल्मेट घातल्यानंतर त्यांच्याकडून एक छोटीशी चूक होते ज्यामुळे पोलिस किंवा रस्त्यावर बसवलेले कॅमेरे पावती फाडायला लावतात.

⬇️⬇️⬇️

लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी

➡️ यादीत नाव पहा ⬅️

पावती नसेल फाडायची तर ही चूक करू नका
जेव्हा तुम्ही स्कूटर किंवा बाईक चालवता तेव्हा हेल्मेट घातल्यानंतर हेल्मेटचा सेफ्टी बेल्ट लावलेला असावा. नुसतं हेल्मेट घातलं आणि बेल्ट लावलेला नसेल तर तुम्हाला दंड बसू शकतो. हेल्मेट घातल्यानंतर लोक पट्टा बंद करत नाहीत आणि तसे केल्यास चालान काढले जाते. या चुकीसाठी तुमच्या खात्यातून किती चलन कापले जाऊ शकते ते आम्ही तुम्हाला सांगतो?

कितीची पावती फाडावी लागणार?
जर तुम्ही हेल्मेट घातले पण पट्टा बंद केला नाही, तर मोटार वाहन कायद्याच्या कलम 194D अंतर्गत प्रथमच 1000 रुपयांचा दंड होऊ शकतो. तुम्ही तीच चूक पुन्हा केल्यास, पुढच्या वेळी 1000 रुपयांचे चलनही कापले जाईल. सरकारने हा वाहतुकीचा नियम कठोर करणं योग्य आहेत ज्यामुळे लोकांना हेल्मेट नीट घालण्याची सवय होईल. अपघातादरम्यान जर हेल्मेटचा बेल्ट लावला नसेल तर हेल्मेट डोक्यापासून वेगळं होतं आणि त्यामुळे डोक्याला जास्त मार लागण्याचा धोका असतो. तेच डोक्यावर हेल्मेट बेल्ट लावलेलं असेल तर डोक्याला मार बसण्याचा धोका कमी असतो. हेल्मेट सुरक्षा कवचासारखं काम करतं. त्यामुळे याचं पालन केलं नाही तर दंड आकारला जाणार आहे.

 

Leave a Comment